आमच्याबद्दल

शुद्ध, पारंपरिक आणि रसायनमुक्त — लाकडी घाण्यातील 100% कोल्ड-प्रेस्ड तेल तुमच्यापर्यंत.

आम्ही कोण? — आमची कथा

आप्पांची वडिलोपार्जित शेती, काळानुसार येणारं नवं तंत्रज्ञान आणि सेंद्रिय तत्त्वांची सांगड — ह्याच पायावर Appa Oil उभं आहे. घरातलं सगळं शुद्ध व नैसर्गिक: सेंद्रिय भाजीपाला, घरच्या शेतातलं धान्य, स्वतःच्या जनावरांचं दूध-तूप; आणि सर्वात खास — घरच्याच शेंगदाण्यांचं लाकडी घाण्यातील तेल. त्या सगळ्यातून तयार होणारं आजीच्या हातचं जेवण… ज्याचा सुगंधही भूक लावतो!

आप्पांची आजी — एक सशक्त, स्वावलंबी स्त्री — १०७व्या वर्षी वृद्धत्वाने दिवंगत झाल्या. त्यांचं आयुष्य साधं, रसायनमुक्त आणि आरोग्यदायी. आजी गेल्यानंतर मात्र घरात लाकडी घाण्याचं पारंपरिक तेल थांबून रिफाइन्ड तेलाचा वापर वाढला; पण शेती मात्र आजीच्या तत्त्वांनुसार शुद्ध सेंद्रियच राहिली.

काही वर्षांतच आप्पांना जाणवलं — गावोगावी चाळिशीतल्या (किंवा कमी वयाच्या) लोकांमध्ये सांधेदुखी, बीपी, हार्ट अटॅक, मधुमेह असे त्रास वाढताना दिसले, जे आजीच्या काळात विरळ होते. शोध घेतला तेव्हा लक्षात आलं: रिफाइन्ड तेल सहज-स्वस्त असल्याने पारंपरिक घाण्याचं तेल बऱ्याच घरांत बंद झालंय. आरोग्य टिकवायचं असेल तर परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ देऊन ती परत आणली पाहिजे — हा ठाम विचार मनात पक्का झाला.

आप्पांनी नाशिक येथे लाकडी घाण्याचं प्रशिक्षण घेतलं; मशीन ऑपरेशन, यंत्रसामग्री आणि प्रक्रियेची सूक्ष्म खबरदारी शिकली. विविध घाणे व तेलांचा तुलनात्मक अभ्यास करून लाकडी घाणा (कोल्ड-प्रेस्ड) आणि रिफाइन्ड तेल यांमधला फरक समजून घेतला.

रिफाइन्ड प्रक्रियेत उष्णता/रसायनांमुळे पोषण घटक कमी होतात; म्हणूनच आम्ही लाकडी घाणा — मंद-दाब, कमी उष्णता या पद्धतीला प्राधान्य देतो. जी कि पारंपरिक पद्धत आहे.

पुढे आप्पांनी तामिळनाडूत विविध घाण्यांचं प्रत्यक्ष निरीक्षण करून टिकाऊ, मनास भावणारे लाकडी घाणे खास बनवून घेतले. आणि मग आला तो दिवस — १८ ऑगस्ट २०१८, केदारवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथून शुद्धतेचा प्रवास सुरू! सुरुवात अगदी मुळातून — दोन घाणे, शेंगदाणे विकत घेऊन स्वतः तेल काढणं, पेंड वेगळी करणं… ही सगळी प्रक्रिया स्वतःच्या हाताने.

कुटुंबाचा भक्कम पाठिंबा कायम; त्यांची पत्नी- उषा आणि मुलगा- आशुतोष. सर्वांनी प्रक्रिया शिकून व्यवसायात खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला. कोविड काळात रोगप्रतिकारक शक्तीबाबत जागरूकता वाढली आणि आम्ही ऋतूनुसार तेल बदलण्याची संकल्पना मांडली — करडई, सूर्यफूल, मोहरी, तीळ (पांढरे/काळे), खोबरेल, जवस, बदाम, अक्रोड — प्रत्येक तेलाचं आपलं वैशिष्ट्य; पेंडही उपयुक्त.

आज Appa Oil - लाकडी घाण्यातील शुद्ध तेल केवळ केदारवाडीपुरतं मर्यादित नाही; महाराष्ट्रभर अनेक घरांच्या स्वयंपाकघरात आणि आरोग्यात स्थान मिळवलं आहे. आणि आता आमची उपस्थिती पेठ नाका, NH-48 येथे — विश्वास आणि आरोग्य तुमच्यापर्यंत, आणखी जवळ!

संस्थापक / Proprietor

श्री. जयवंत पाटील — Appa Oil चे संस्थापक आणि लाकडी घाणा तज्ज्ञ

श्री. जयवंत पाटील

संस्थापक, Appa Organic — लाकडी घाणा तज्ज्ञ

२०१८ पासून नैसर्गिक, कोल्ड-प्रेस्ड तेलांची शुद्ध परंपरा — कमी तापमान, रसायनमुक्त प्रक्रिया आणि पारदर्शक व्यवसाय.

7+
वर्षे अनुभव
2018
स्थापना
1,000+
कुटुंबांची पसंती

तांत्रिक माहिती व प्रक्रिया

प्रेसिंग तापमान

35–45°C (कमाल 45°C)

दाब पद्धत

लाकडी घाणा (मंद RPM)

उष्णता नियंत्रण

सतत नैसर्गिक हवा (Cooling)

फिल्टर

24–48 तास नैसर्गिक सेटलिंग

रसायनमुक्त

नो सॉल्व्हेंट / नो ब्लिचिंग

पॅकेजिंग

अन्न-ग्रेड PET / काच

💡 आमचं उद्दिष्ट: कमी उष्णतेत तेल काढून व्हिटॅमिन E, ओमेगा फॅटी ॲसिड आणि नैसर्गिक सुगंध जपणे.

🎯

आमचे ध्येय (Mission)

प्रक्रिया केलेल्या (refined) तेलांबद्दल जागृती करून शुद्ध, अनरिफाइंड कोल्ड-प्रेस्ड तेल प्रत्येक घरापर्यंत परवडणाऱ्या दरात पोहोचवणे.

  • लाकडी घाण्याचे महत्त्व सोप्या भाषेत सांगणे.
  • संतुलित आहार आणि बीपी/शुगर व्यवस्थापनास मदत.
  • शेतकरी-समर्थन आणि पारदर्शक उत्पादन.
👁️

आमचे व्हिजन (Vision)

भारतभरातील प्रत्येक कुटुंबासाठी विश्वासार्ह कोल्ड-प्रेस्ड तेल हा सहज उपलब्ध पर्याय बनवणे. विस्तार करताना शुद्धता आणि विश्वास अबाधित ठेवणे.

  • परंपरा × विज्ञान: लाकडी घाणा व आधुनिक पॅकेजिंग.
  • ग्रामविकास व रोजगार वाढवणारी पुरवठा-शृंखला.
  • भारतीय संस्कृतीतील तेलाचे स्थान जपणे.

🥗 आमचं आरोग्य-मार्गदर्शन

  • दैनंदिन वापरासाठी नेहमी लाकडी घाण्याचे तेल निवडा.
  • आहार, हालचाल आणि झोप यांसोबत योग्य तेल बीपी/शुगर नियंत्रणास मदत करते.
  • ऋतूनुसार तेलाची निवड करा (उदा. थंडीत तीळ/मोहरी, उन्हाळ्यात खोबरेल).

आमचा संकल्प

१००% शुद्ध, रसायनमुक्त
फक्त लाकडी घाणा पद्धत
आरोग्यदायी फायदे पोहोचवणे
ग्रामीण रोजगार सक्षमीकरण

आमच्यावर विश्वास का?

कोल्ड-प्रेस्ड परंपरा
नो-केमिकल्स
नैतिक दृष्टिकोन
२०१८ पासून कार्यरत
१,०००+ कुटुंबे

ग्राहक अभिप्राय

“लाकडी घाण्यातील तेल वापरल्यापासून आमचं जेवण जास्त हलकं आणि पचायला सोपं वाटतं.” — R.K., कोल्हापूर
“मुलांच्या डब्यासाठी भाज्यांना हा चविष्ट तडका उत्तम बसतो.” — K.P., सातारा
“कुरकुरीत पोळी-भाजीसाठी शेंगदाणा तेल खूप आवडते.” — A.R., सांगली

"स्नेहवंतं अन्नं दीर्घायुष्यकरं।"

"नैसर्गिक तेलयुक्त अन्न दीर्घायुष्य वाढवते."

— Ayurveda Sara Sangraha